कागल तालुक्यातील बंधारा पाण्याखाली: काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी

कागल :  कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बंधारे गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याखाली असल्याने स्थानिकांना मोठी अडचण येत आहे. या बंधाऱ्यांवरून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली वाहतूक होत असल्याने यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित होत आहे.

Advertisements

या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. चंद्रकांत बोंगे यांना निवेदन देऊन या बंधाऱ्यांची उंची वाढवण्याची मागणी केली आहे. स्थानिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन प्रशासन या दिशेने त्वरित पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!