
मुरगूड ( शशी दरेकर ) -भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती आहे. या संस्कृतीची जतन करणे काळाची गरज आहे. संस्कृतीचा ठेवा सध्याच्या पिढीला शिकवणे गरजेचे आहे. आजचा विद्यार्थी संस्कारहीन बनत आहे त्याला वेळीच आवर घालण्यासाठी मूल्य शिक्षणाचे धडे शाळेत देऊन एक आदर्श विद्यार्थी तयार करा.संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या बरोबर पालकांचीही आहे. आपल्या पाल्यावर लक्ष ठेवा वेळीच सावध व्हा आणि उदयोन्मुख भारताचा एक आदर्श नागरिक तयार करा असे प्रतिपादन मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूडचे प्राचार्य
एस.पी.पाटील यांनी केले.
ते मुरगूड तालुका कागल येथे लिटल मास्टर गुरुकुलम च्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभात बोलत होते. लिटल मास्टर गुरुकुलम चे संस्थापक सुभाष अनावकर, प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विविधरंगी गाण्यांचे सादरीकरण झाले त्यामध्ये राष्ट्रगान कॅसिओ, महाराष्ट्र गौरव गीत, शेतकरी आत्महत्या, लावणी, कोळीगीत, माऊली माऊली वारकरी गीत, आम्ही शिवकन्या, देशभक्तीपर गीत, सोलो डान्स, स्केटिंग डान्स, शेतकरी गीत, फनी डान्स, मेरा वाला डांस तसेच चिमुकल्यांचे गणुल्या रे व किलबिल किलबिल पक्षी बोलती इ. ५०च्या वर डान्स सादर करत सर्वांची वाहवा मिळवली.
स्वागत शितल चौगुले तर सुमन अनावकर यांनी प्रास्ताविकामध्ये त्यांनी शाळेच्या उज्वल इतिहासाला उजाळा देत गुरुजींनी छडी सोडली तशी भावी पिढी बिघडत चालली, लिटल मास्टर गुरुकुल मध्ये अध्यात्म व विज्ञान तसेच आधुनिक शैक्षणिक धोरण याची सांगड घालून मुलांना सुसंस्कारीत घडविण्याचे कार्य केले जाते. असेही त्यांनी उद्देशून सांगितले .
यावेळी बाळासाहेब शिंदे, संग्राम खेबुडे,सर्व शिक्षक वृंद, स्कूल बस मालक, मदतनीस व विद्यार्थी, पालक , शिक्षक ,विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रेया मंडलिक व माधुरी सावर्डेकर यांनी तर आभार अलका गायकवाड यांनी मांनले.