नाचणारा घोडा, ध्वज पथक, मर्दानी खेळ आणि लाईट शो ठरले खास आकर्षण
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड शहर येथील संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समिती मुरगूड यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो.
यंदाचे हे चौथे वर्ष दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा हजारो लोकांच्या गर्दीमध्ये उत्साहात संपन्न झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा म्हणून या सोहळ्याची ओळख आहे .गेले अनेक वर्ष हेलिकॅप्टर मधून पुष्पृष्टी, मिरवणूक, लाईट शो, महिलांसाठी विविध कार्यक्रम असे भरगच्च नियोजन असते .यावर्षी राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन काशिलिंग बिरदेव मंदिरापासून मशाल शिवतीर्थ येथे आणण्यात आली.

यानंतर मुरगूड येथील गोंधळी समाजातर्फे गोंधळ गीताच्या कार्यक्रमात भंडाऱ्याची मुक्त उधळण झाली . यावेळी तरुणांनी मोठा सहभाग दर्शवला .मुख्य दिवशी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून सवाद्य पालखी काढण्यात आली. ही मिरवणूक शिवतीर्थ येथे आल्यानंतर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या उत्सव मूर्तीस विधिवत अभिषेक झाला .याचे पौरोहित्य वैभव जंगम स्वामी यांनी केले .पंचामृत दूध आणि मंत्रांच्या घोषामध्ये अभिषेक संपन्न झाला.

यावेळी मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज आणि नगरपालिका कर्मचारी यांनी शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पृष्टी केली . सायंकाळी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून शोभायात्रा भव्य मिरवणुकीने काढली. या शोभा यात्रेचे उद्घाटन युवा नेते विश्वजीत रणजीतसिंह पाटील, युवा नेते सत्यजितसिंह अजितसिंह पाटील, उद्योगपती जावेद मकानदार, संतोष कुमार वंडकर, दगडू शेणवी ,रणजीत सूर्यवंशी, बिंदू चौगुले, सुहास खराडे, बजरंग सोनुले , संदीप उर्फ गब्बर भारमल यांच्या हस्ते करण्यात आले.
शोभायात्रेमध्ये जय श्री राम ध्वज पथक कागल यांचे ध्वज पथक खेळ मैदानी खेळ ,धनगरी ढोल, कैचाळ, हलगी-घुमके, अकलूजचे सैराट हालगीपथक आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवली यावेळी खास आकर्षण ठरले ते नाचणारा घोडा ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी व महिलावर्गाने गर्दी केली होती .
कमिटी मेंबर सर्जेराव भाट, पांडुरंग मगदूम , युवराज सूर्यवंशी ,ओंकार पोतदार , अरुण मेंडके, सुशांत मांगोरे, पृथ्वी चव्हाण, रोहित मोरबाळे ,सोन्या,अजित कांबळे,आकाश डेळेकर, पृथ्वी भुते ,अतुल आमते,रणजीत मोरबाळे यांनी या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन केले होते.
अंबाबाई मंदिर ते राणा प्रताप चौक इथे या मिरवणुकीच्या शेवट करण्यात आला यानंतर रात्री लेसर शो आणि आतषबाजी करून आनंद उत्सव सोहळा साजरा करण्यात आला .यामध्ये तरुणाई मोठ्या जल्लोषात सहभागी झाली होती .या आनंद सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे महिला वर्गाने ही सुरक्षित रित्या या आनंद सोहळ्याचा लाभ घेतला. महिलांसाठी वेगळी व्यवस्था संयुक्त शिवप्रेमी तर्फे करण्यात आली होती . त्यामुळे निर्दास्तपणे महिला देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
कमिटी मेंबर शिवभक्त सर्जेराव भाट, पांडुरंग मगदूम , युवराज सूर्यवंशी ,ओंकार पोतदार , अरुण मेंडके, सुशांत मांगोरे पृथ्वी चव्हाण, रोहित मोरबाळे सोन्या,अजित कांबळे,आकाश डेळेकर, पृथ्वी भुते ,अतुल आमते,रणजीत मोरबाळे यांनी या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन केले होते .
You made some good points there. I did a search on the subject and found most people will go along with with your site.