मुरगूडच्या युथ सर्कल यांच्या वतीने किल्ला रांगणा येथे स्वच्छता मोहिम

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील युथ सर्कल मुरगुड यांच्यावतीने भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे स्वच्छता मोहीम व ट्रेकिंग असा कार्यक्रम पार पडला.

Advertisements

रांगणा किल्ला च्या चारी बाजूला एकुण 17 किलोमिटर चे अंतर चालत व देखरेख करत कांहीं ठिकाणची झालेली पडझड ,व स्वच्छता मंडळा मार्फत पार पाडली. कांहीं ठिकाणी बुरुज तर विहीर, तलावाची स्वच्छता करण्यात आली.

Advertisements
रांगणा येथे किल्ल्याची स्वच्छता करताना मुरगुड येथील युथ सर्कलचे कार्यकर्ते

यावेळी मुरगुड नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राहुल वंडकर, राजू चव्हाण, शहर वडाप संघटनेचे अध्यक्ष सुरेश शिंदे, वसंत चव्हाण, राजू नलवडे , संदीप सारंग, सचिन सारंग, ओंकार वंडकर, आकाश डेळेकर, सौरभ वंडकर,आक्षय गळपासे,प्रणव रामाणे, योगेश सांरग, राजवर्धन पुजारी , श्रीयश वंडकर, आदित्य मेंटकर,हर्षद पुजारी,प्रणव डेळेकर,आदी च्या उपस्थितीत राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम पार पडली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!