मुरगूड (शशी दरेकर) : नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसावर आला आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुडीतील तरुणांनी मुरगुडचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता केली. तब्बल चार तास तरुणांनी या ठिकाणी संपूर्ण मंदिर स्वच्छता करून मुरगुड अग्निशामक दलाच्या बंबामार्फत संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन काढले. यावर्षी जानेवारी महिन्यात मुरगुडच्या अंबाबाई मंदिराची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराची प्रार्थना शांती समारंभ पार पडला होता.
यावेळचा नवरात्र उत्सव नवीन मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे .याच्या आधी मुरगुडच्या तरुणांनी एकत्र येत हे संपूर्ण मंदिर स्वच्छ करून पाण्याने धुऊन काढले यावेळी मुरगुड शहरातील शेकडो तरुणांचा सहभाग होता. हातामध्ये झाडू, खराटा स्वच्छतेचे साहित्य घेत तरुणांनी सकाळी सहा वाजता मंदिराची स्वच्छता करण्यास प्रारंभ केला सकाळी दहा वाजता संपूर्ण मंदिराची स्वच्छता करण्यात आली. मंदिराचा सभागृह हॉल गाभाऱ्यासह शिखराची स्वच्छता यावेळी तरुणांनी केली.
यावर्षी नवीन मंदिरामध्ये पहिल्यांदाच नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरगुडच्या ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात माहेर वाशि , कोल्हापूर जिल्हा सह बाहेरच्या जिल्ह्यातून भावीकभक्त नवरात्र काळामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर यंदाच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात या मंदिराची प्रसाद वास्तुशांती समारंभ संपूर्ण होऊन मंदिर भाविकांच्या साठी खुले करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून अंबाबाई ची पूजा मध्ये असणारी पूजा यासाठी अनेक भाविक मंदिरामध्ये येऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेत आहेत.
यावेळी संदीप उर्फ गब्बर भारमल, जगदीश गुरव, अभिजीत गुरव, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, श्रीरंग गुरव, उद्धव मिरजकर, सागर चौगुले, राज तांबट, शिवाजी रावण, चिनू रामाने, महादेव गोंधळी, संदेश शेणवी यांच्यासह शेकडो तरुण उपस्थित होते.