पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम): व्हन्नूर ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर या प्रशालेत ग्रामपंचायत व्हन्नूर यांच्यामार्फत बालसभेचे आयोजन केले होते. या बालसभेत बालकांचे हक्क आणि कर्तव्य, बालविवाह, बालकामगार, १५ व्या वित्त आयोगातून बालकांना मिळणाऱ्या सुविधा, सामाजिक सुरक्षा या सारख्या अनेक विषयांवर चर्चा घडून आली. यावेळी व्हन्नूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा मोरे यांनी बालसभेची संकल्पना मांडली. ग्रामसेविका योजना जंगम यांनी बालसभेबाबतच्या परिपत्रकाचे व त्यातील विषयांचे वाचन केले.
या बालसभेस उपसरपंच मंगल कोकणे, ग्रा. प. सदस्या सुजाता पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. बालसभेचे प्रास्ताविक बी. बी. खाडे यांनी केले तर आभार आर. व्ही. इंगवले यांनी मानले.