कागल पंचायत समिती मध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान कार्यशाळा संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : येथील पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे हे होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती व लोकसहभागातून त्या योजना कशा पूर्ण कराव्यात याचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी करत, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा असे त्यानी आव्हान केले.

Advertisements

यामध्ये शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेतले आहे. शासनाच्या विविध योजना आहेत. गाव पातळीवर त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. तो वाढविण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगाने तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, सरपंच, पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांचे खाते प्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर, ग्राम रोजगार सेवक यांच्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान विभाग व आपले सरकार सेवा केंद्र या विभागाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

Advertisements

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद तारळकर यांनी शासनाच्या विविध विभागांतर्गत येणाऱ्या योजना, त्यामध्ये गाव स्तरावर लोकसभा कसा वाढवावा. सर्वांच्या सहकार्यातून कामे कशी पूर्ण करावी. याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुनीचे सरपंच बापू यादव यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisements

यावेळी स्वागत विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग निवृत्ती जमदाडे यांनी केले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, पाणीपुरवठा उपअभियंता सचिन देशमुख, कृषी अधिकारी गौरी मठपती, आप्पासाहेब माळी, कक्ष अधिकारी संगीता काळे, ए.जी. पाटील, सांख्यिकी विस्तार अधिकारी अरविंद पाटील, नासिर नाईक, शबाना मुल्ला, अमय चिले आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग दिलीप माळी यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!