सुळकूड ( प्रा.सुरेश डोणे) : शालेय विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास, राज्य व राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि शालेय-सहशालेय विविध उपक्रमांच्या जोरावर श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर(ता.कागल) या माध्यमिक प्रशालेने “मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा” या उपक्रमात कागल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून ३ लाख रुपये पारितोषिक मिळविले.
प्रशालेची जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी निवड होऊन माध्यमिक विभाग, जि.प. कोल्हापूरच्या समितीकडून प्रशालेचे प्राथमिक मूल्यांकन पूर्ण झाले आहे. शाळेने विद्यार्थ्यांकरिता आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याकामी संस्था, ग्रामस्थांच्या सहकार्याबरोबरच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतः पदरमोड करून विद्यार्थी हित जोपासले आहे.
शांत-सुंदर नैसर्गिक परिसर लाभलेल्या विद्यालयाने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थांचे अभिनंदन होत आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा निकम, सचिव यशवंतराव निकम, संचालक मंडळाची प्रेरणा व गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे,विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे व केंद्रप्रमुख सुनंदा किणीकर यांचे प्रोत्साहन लाभले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत कागल तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार व शिक्षकांचे अभिनंदन जिल्ह्याचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
My brother suggested I might like this website He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks