मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३५०० रू. भाव मिळाला पाहिजे व मागील वर्षाचे थकबाकीचे ४०० रुपये मिळालेच पाहिजेत यासाठी मुरगूड येथे देवगड निपाणी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल तासभर आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता.
यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांनी ग्रामदैवत अंबाबाई मंदिर ते नाका नंबर एक येथे मोटरसायकल रॅली काढून रास्ता रोकोला सुरुवात केली . यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या “ऊस खाल्ला कोल्ह्यांनी, साखर खाल्ली चोरांनी” “या साखर सम्राटांचे करायचे काय, खाली डोके वर पाय.” यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मुरगूड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची नुकतीच भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी संपूर्ण जिल्हाभर चक्काजामचे आवाहन केले होते. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून मुरगुड निपाणी देवगड महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला.
यावेळी या रस्त्यावर चारी बाजूने येणारी वाहने रोखण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मनोगता मध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या .शेतकरी हा अन्नदाता असूनही समाजात एक उपेक्षित घटक ठरला आहे. राजू शेट्टींनी अगदी हिशोबाने मागच्या ४००ची मागणी केली आहे. यंदाचा भाव ३५०० घेतल्याशिवाय राहणार नाही असे अनेकांनी ठणकावले. सध्या कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. शेतकरी हा अन्नदाता असूनही समाजात एक उपेक्षित घटक ठरला आहे. शेतकऱ्यांकडे कोणाचेही लक्ष नाही त्यांचे लक्ष वेधण्यासाठीच हा चक्काजाम आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी संदीप भारमल, सुरेश साळोखे, मारुती चौगले, जोतिराम सूर्यवंशी, दत्तात्रय आरडे, समाधान हेंदळकर, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव भराडे, मारुतीराव चौगले, गजानन साळोखे,कृष्णात सोनाळे (मळगेबु), संदीप भारमल, दतात्रय मंडलिक, जोतीराम सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, शेखर सावंत बानगे ,जयवंत पाटील कुरुकली यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला .या आंदोलनात मयूर सावर्डेकर, राणोजी गोधडे, सचिन मेंडके, प्रा.संभाजी आंगज, शिवाजी कमळकर, राम सातवेकर, राजेंद्र भारमल, रघुनाथ चौगले, शशिकांत चौगले, सर्जेराव भाट, जगदीश गुरव, पृथ्वीराज बाबर, शिवाजीराव चौगले, जयसिंग भोसले, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी इत्यादी उपस्थित होते .यावेळी मुरगूड पोलीसांनी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाळके यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन शांततेने पार पडले.
यावेळी मुरगूड व परिसरातील भडगाव, चिमगाव, कुरणी, कुरुकली, मळगे खूर्द, मळगे बु, आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.