सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा

कागल : श्री. सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा करण्यात आला. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे दूध उत्पादकांनी देशी गाईंच्या संगोपनासाठी अधिकचे प्रयत्न करावेत असे आवाहन व्ही.जी. पोवार यांनी केले.

Advertisements

संस्थेचे चेअरमन मधुकर आगळे व व्हा. चेअरमन शिवाजी मगदूम यांच्या हस्ते गायीचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक सुभाष पाटील, संजय येवलुजे, महादेव ठाणेकर, माजी सरपंच तुकाराम हजारे, कोतवाल सुनिल पाटील, बापू पाटील, हिंदुराव पाटील, संजय साठे, मॅनेजर चंदर मगदूम, बळीराम मगदूम, डॉ.दादू पोवार व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!