मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फ ” शिवप्रताप दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड बाजारपेठेतील शिवप्रेमिच्या वतीने ३६२वा “शिवप्रताप ” दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री . अमर गिरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी बोलतानां ते म्हणाले १६५९ साली स्वराज्यावर अफझलखानाच्या रूपाने मोठे संकट आले . छत्रपती शिवरायानीं ध्यैर्याने व युक्तीने अफझलखानाचा वध केला . आणि स्वराज्यावरील संकटाचा धोका टळला. याचे स्मरण म्हणून हा दिवस ” शिवप्रतापदिन ” म्हणून साजरा केला जातो. यावेळी धोंडीराम परीट (जय महाराष्ट्र) यांनीही छ. शिवरायांच्या एकेक शौर्याच्या आठवणीनां उजाळा दिला.

Advertisements

या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमास विशाल मंडलिक, उद्धव मिरजकर, अमित दरेकर, तानाजी कुडवे, शिवाजी चित्रकार, पिंटू रणवरे, श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, शशी दरेकर, गौरव मोर्चे, औकार दरेकर व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements

.

Leave a Comment

error: Content is protected !!