मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड शहरामध्ये आषाढी एकादशीनिमित्य कुंभारगल्ली येथिल विठ्ठल मंदीरामध्ये तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज विठ्ठल मंदीर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी मुरगूड येथिल कुंभारगल्ली विठ्ठल मंदीरातून दिंडी शहर प्रदक्षिणासाठी बाहेर पडली . सर्व मुख्य मार्गावरून दिंडी पुन्हा विठ्ठल मंदीरात आली.
शहरामध्ये सर्वच ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले . राणाप्रताप चौकात येरुडकर कुंटूबियानी दिंडीतील वारकऱ्यानां खिचडी , फराळाचे वाटप करण्यात आले . तसेच बाजारपेठेतील एमजी एग्रो चे मालक श्री . जावेद मकानदार व लकी सेवा केंद्राचे मालक हाजी .धोंडिबा मकानदार यानीही दिंडीतील वारकऱ्यांना फराळ व चहाचे वाटप केले .ईदच्या पवित्र सणाच्या
पार्श्वभुमिवर आषाढी एकादशीच्या दिंडीतील वारकऱ्यानां त्यानी केलेल्या फराळाच्या वाटपाच्या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे .
तसेच मुरगूडमधील ” लिटल मास्टर. गुरुकुलम हुतात्मा स्मारक ” येथिल लहान मुलानी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्य दिंडी काढण्यात आली . गणेश मंदीर ते शाळेपर्यंत या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . या दिंडीमध्ये विठ्ठल -रुक्मिणी , तुकाराम , वारकरी अशा विविध बालचमुनी वेषभूषा साकारल्या होत्या . त्याचबरोबर सौ . सिंधूताई कोंडेकर यानीं भजन व मुलांच्या भाषणांचा कार्यक्रम घेण्यात आला . त्या नंतर श्री .सुभाष अनावकर यांच्या हस्ते मुलानां खाऊ वाटप करण्यात आले .सौ. सुमन अनावकर यांच्यासह सर्व शिक्षकानी व पालकानी अथक परिश्रम घेतले .
एकूणच मुरगूड शहरात ” आषाढी एकादशी ” भक्तीमय वातावरणात व उत्साहात पार पडली .