नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या नियमित बोर्ड परीक्षेत एक किंवा अधिक विषयांत अपेक्षित गुण मिळाले नाहीत किंवा जे आपले गुण सुधारू इच्छितात, त्यांच्यासाठी ही परीक्षा एक सुवर्णसंधी आहे.
अधिकृत घोषणेनुसार, इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षा 15 जुलैपासून सुरू होऊन 22 जुलै रोजी संपतील. तर, इयत्ता 12वीच्या पुरवणी परीक्षा 15 जुलै रोजी एकाच दिवशी घेण्यात येतील.

परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत घेतल्या जातील. काही वैकल्पिक आणि व्यावसायिक विषयांसाठी परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. विद्यार्थ्यांना अधिक माहिती आणि विषयनिहाय वेळापत्रकासाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
cbse supplementary exams 2025 class 10