कोल्हापूर, : ५६ महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक (NCC), कोल्हापूर कार्यालयामार्फत सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एन. सी. सी. भवन, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे विविध वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांमधील सहभागींसाठी प्रतिदिन न्याहारी, सकाळी चहा-बिस्किट, दुपारचे जेवण, सायंकाळचा चहा-बिस्किट आणि रात्रीचे जेवण, अशा शिबिर अन्नश्रेणीनुसार (मेनू) अन्नपुरवठा करण्यासाठी (प्रति व्यक्ती प्रतिदिन) खर्चाची दरपत्रके मागवण्यात येत आहेत.

इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके दिनांक १० जुलै २०२५ पर्यंत समादेशक अधिकारी, ५६ महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी. भवन, दुसरा मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर यांच्या नावे पाठवावीत, असे आवाहन ५६ महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथकाचे कमांडरिंग अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३१-२६९४५८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.