कागल (प्रतिनिधी) : करनूर (तालुका कागल ) येथील उदय बाळकू पाटील यांचे घरात रविवारी चोरी झाली होती. .सहा तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम रुपये ५५ हजार व किंमती कपडे असा एकूण ५ लाख २४ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल चोरी करून अज्ञात चोरट्यानी पोबारा केला. चोरीच्या प्रकाराची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे .उदय पाटील हे बेंगलोर जवळील टुमकुर गांवी नातेवाईकांच्या कार्यक्रम साठी गेले होते. ते परत आल्यानंतर मालाची गणती करण्यात आली.
कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून रविवारी रात्री करनूर गावात दोन ठिकाणी चोरी झाली .उदय बाळकू पाटील हे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश केला. घरात असलेल्या तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकले. तिजोरीतील असलेले सहा तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच रोख रुपये ५५ हजार, किंमती कपडे मोबाईल व पोतंभरलेले लहान मुलांची खेळणी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान सोमवारी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. चोरी झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या चौकात जाऊन ते तेथेच घुटमळले. या चोरीच्या प्रकाराने नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करनूर गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत अशी मागणी ग्रामस्थांनी उचलून धरली आहे. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार हे पुढील तपास करीत आहेत.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me? https://www.binance.com/sk/register?ref=OMM3XK51
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.