कागल (विक्रांत कोरे) :करनूर(ता.कागल)येथे रक्तदान शिबिरात पार पडले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय,छत्रपती प्रमिलाराजे रक्तपेढी कोल्हापूर व थॅलेसेमिया निर्मूलन असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.मरीआई मंदिर येथे हे शिबिर आयोजित केले होते.
वाढत चाललेली रक्ताची मागणी, रक्ताचा होत असलेला अपुरा पुरवठा या अनुषंगाने आशा गटप्रवर्तक सुप्रिया गुदले यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले.हा सामाजिक उपक्रम सलग पाच वर्षे चालू आहे.
यावेळी माता बाल संगोपन अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ फारुख देसाई, सी पी आर चे रक्त संकलन अधिकारी डॉ सुप्रिया लोखंडे ,थैलेसेमिया असोसियन चे अध्यक्ष अनिल व्हटकर , उद्योजक सागर कलानी ,तालुका स्टाफ,प्रा आ केंद्र आरोग्य सहाय्यक, सी एच ओ,उपकेंद्र आरोग्य सेवक सेविका ,आशा स्वयंसेविका, मनीषा भोसले , संमती चौगुले, राणी मगदूम, माधुरी जाधव,गंगोत्री राणगे,अनुपमा चौगुले या महिलांनी सहभाग नोंदवला. सर्व रक्तदाताना उद्योजक सागर कलानी यांच्या हस्ते वृक्षरोप देऊन सन्मानित केले
यावेळी बाळासो पाटील, उपसरपंच तानाजी भोसले, अश्विनी चौगुले, रोहन पाटील, कुमार पाटील ,कॉ शिवाजी मगदूम नंदकुमार पाटील, तानाजी शिंदे सुनील गुदले, पोपट गुदले तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.