
शिवराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडचा विद्यार्थी कु. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (यमगे ) हा आयपीएस परीक्षेत ५५१ च्या रँकने उत्तीर्ण होत अतुलनीय यश संपादन केले आहे . त्यामुळे शिवराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवत हॅट्रीक केली आहे.
यापूर्वी शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडचा विद्यार्थी राजेंद्र जालीमसर ( शिंदेवाडी ) हा आय ए एस झाला होता. तसेच शितल कर्णे ( सोळांकूर )ही आयएसएस झाली आहे. त्या पाठोपाठ ११ वी ,१२ वी मध्ये शिकत असलेला यमगे गावचा हुशार गरीब होतकरू विद्यार्थी बिरदेव डोणे याने विज्ञान शाखेत ८९ टक्के मार्क मिळवून तालुक्यात प्रथम तसेच ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.
त्याने आता आयपीएस परीक्षेत ५५१ च्या रँकने उत्तीर्ण होत शिवराजच्या यशात हॅट्रीक करून नावलौकिक केला आहे . तसेच धनगर समाजातील आई वडिलांचे पांग फेडले असून यमगे गावाला देशपातळीवर नेण्याचे कौतुकास्पद कामगिरी केली आहे .