पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जागतिक वन दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव खुर्द येथील गाव तलावा जवळ पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. पक्षी अभ्यासक व शिक्षक वैभव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:45 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली.
पक्षी निरीक्षणाबरोबरच पक्षांची गणना सुद्धा करण्यात आली. पक्षांमधील जैवविविधता त्यांचे भक्ष, त्यांचा जीवनक्रम इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पक्ष्यांच्या खादयानुसार त्यांच्या चोचीची रचना बनलेली असते.त्यांची चोच त्यांचे भक्ष मिळण्यासाठी पूरक बनलेली असते. हुदहुद पक्षी, धनेश पक्षी, पोपट यांच्या चोचीच्या रचनेवरून उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या पक्षी निरीक्षणामध्ये खालील प्रमाणे पक्षी आढळले 1)राखी दिनेश २) हुदहूद 3) कोतवाल 4) फुलटोचा 5) धोबी 6) चंडोल 7) जांभळा सूर्यपक्षी 8) लालबुड्या बुलबुल 9) पानकावळा 10) नदी सूरय 11) वंचक 12) कोकीळ 13) जांभळी पाणकोंबडी 14) होला 15) दयाळ 16) कबूतर 17) वारकरी बदक 18)तीर चिमणी 19)कवड्या खंड्या 20) पांढऱ्या छातीचा खंड्या 21) खंड्या 22) राखी वटवट्या, 23) शिंपी पक्षी 24) भारतीय चष्मेवाला 25) मोर 26) वेडा राघू 27) तारवाली भिंगरी 28) बगळा विद्यार्थ्यांना पर्यावरणामध्ये पक्षी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, आणि प्रदूषण यामुळे पक्षांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे याची जाणीव करून देण्यात आली.