बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा : स्थानिक गुन्हे अन्वेषण व पोलीसांची संयुक्त कारवाई

गर्भलिंग तपासणी रॅकेट उघड होण्याची शक्यता

मुरगूड ( शशी दरेकर ) : बिद्री (ता.कागल) येथे गर्भलिंग तपासणी होत असल्याच्या माहितीवरुन श्रद्धा हॉस्पिटलवर आज सायंकाळी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकासह इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला.या धडक कारवाईत
एक सोनोग्राफी मशीन आणि एजंटासह काही औषधे ताब्यात घेतली.त्यामुळे गर्भलिंग तपासणी रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

Advertisements

पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, गारगोटी – कोल्हापूर या मार्गालगत बिद्री येथे असलेल्या श्रद्धा हॉस्पिटल आहे.याठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

Advertisements

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आज सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकाने बिद्री येथे श्रद्धा हॉस्पिटलवर संयुक्त छापा कारवाई केली.या हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गर्भलिंग तपासणीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला खबऱ्याकडून मिळाली होती.

त्यानुसार एक डमी महिला तपासणीसाठी पाठवण्यात आली.याच दरम्यान हॉस्पिटलवर संयुक्त छापा कारवाई करण्यात आली.या कारवाई मध्ये डॉ. युवराज पाटील, शिंदे नामक एजंट व मेडीकल चालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.तर एक सोनोग्राफी मशीन आणि एजंटासह काही औषधे ताब्यात घेतली आहेत.अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी दिली.

यापूर्वी देखील या ठिकाणी छापा कारवाई दोन वेळा झालेली होती. त्यानंतर आज पुन्हा कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या प्रकरणी पंचनामा करुन पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरुच होते.

Leave a Comment

error: Content is protected !!