कागल (सलीम शेख) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज, कागल येथे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन विद्यार्थी-शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य टी. ए. पोवार, विद्यार्थी मुख्याध्यापिका श्रावणी पोळकर यांनी खर्डेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्य पाहुणे श्री एन. सी. काटे यांनी खर्डेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य पोवार यांनी खर्डेकर यांचे शैक्षणिक आणि राजकीय योगदान विशद केले. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले.
परिक्षा विभाग प्रमुख एम. बी. घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा दिवस विद्यार्थी-शिक्षक दिन म्हणून साजरा केला. के. आय. जमादार यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून फूड स्टॉलचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. टी. ए. पाटील यांनी केले आणि आभार एस. के. भोसले यांनी मानले. सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.