कोल्हापूर (जिमाका) : सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियांतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा Common Entrance Test (सीईटी), Joint Entrance Examination (जेईई), Nationl Eligibility Cum Entrance Test (एनईईटी), Graduate Aptitude Test In Engineering (जीएटीई), National Aptitude Test In Architecture (एनएटीए) शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा व अर्ज ऑफलाईन पध्दतीने मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह सर्व मुळ कागदपत्रासह दिनांक 31 जानेवारी 2025 च्या आत समितीकडे सादर करावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उमेश घुले यांनी केली आहे.
तसेच ज्या अर्जदारांनी समितीकडे यापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत व ज्यांना समितीमार्फत त्रुटी बाबत ई-मेल द्वारे, एसएमएस व्दारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. अशा अर्जदारांनी समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह, मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह ऑनलाईन पध्दतीने तसेच समक्ष कार्यालयात उपस्थित राहून त्रुटीची पूर्तता करावी.