
कोल्हापूर(जिमाका): जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिकांच्या तक्रार निवारणासाठी समिती स्थापन करावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून इच्छुक सदस्यांनी आपली नावे कार्यालयीन मोबाईल क्रमांक 9172035612 या व्हॉटसअप वर नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.

प्रत्येक तालुक्यातुन एका सदस्याची निवड करायची आहे. तथापि प्रत्येक तालुक्यातून एक पेक्षा जास्त इच्छुकांची नावे आल्यास मुलाखतीद्वारे योग्यतेनुसार निवड करण्यात येईल. यासाठी सर्व इच्छुकांनी दिनांक 18 डिसेंबर 2024 पर्यंत रॅंक, नाव, गाव, तालुका, व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक व इच्छुक आहे असे नमुद केलेला मेसेज पाठवावा. शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी मुलाखती घेवून निवड करण्यात येईल. निवड झालेल्या सदस्यांना दोन वर्षाचा कालावधी असेल व तसे ओळखपत्र देवून नियुक्ती देण्यात येईल.