मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र शासनाचे विद्यमाने भुवनेश्वर (ओरिसा) येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धा २०२३ – २०२४ साठी आसिफखान पठाण यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य संघात सलग चौथ्यांदा निवड झाली. मुंबई येथील महेंद्र स्टेडियम येथे सदर निवड चाचणी पार पडली. आसिफखान पठाण हे कास्ट्राईब भूमि अभिलेख संघटनेचे जिल्हाअध्यक्षही आहेत.
सध्या आसिफखान पठाण हे मुरगूड परिरक्षण भूमापक येथे कार्यरत आहेत. सदर निवडी कामी त्यांना श्री. सुदाम जाधव- जिल्हाअधीक्षक भूमि अभिलेख (कोल्हापूर), श्री. सौरभ तुपकर- उप अधीक्षक भूमि अभिलेख (कागल), यांचे मार्गदर्शन तर मध्यवर्ती भूमि अभिलेख संघटनेचे अध्यक्ष- श्री. युवराज चाळके, कार्याध्यक्ष- श्री. नंदकुमार इंगळे, सल्लागार- श्री., प्रशांत पाटील, संपर्क प्रमुख – श्री. महेश साळोखे, सरचिटणीस – श्री. अभिजीत खोत आदींचे प्रोत्साहन लाभले. अखिल भारतीय हॉकी संघातील त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतूक होत आहे.