
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल साहित्यिक श्री . अशोक दरेकर यानां विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेबद्ल” ग्रामिण पत्रकार संघ ” महाराष्ट्रराज्य यांच्यातर्फे कोल्हापूर येथे पुरस्कार देऊन त्यानां सन्मानीत करण्यात आले .
मुरगूड येथिल इंजिनियर श्री . अशोक धोंडिबा दरेकर यांची विविध क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनिय कार्य विचारात घेऊन त्यानां हा पुरस्कार देण्यात आला.

दरेकर हे सध्या सातारा येथे वास्तव्यास असून कला , क्रिडा , साहित्य , इंजनियरिंगमधील बांधकामे, गुडी स्पर्धा इत्यादीमध्ये त्यानां१४ राज्यस्तरीय पुरस्कार अनेक जिल्हयातून प्राप्त झाले आहेत. “मुरगूडी डेज ” हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले. त्यांच्या तील ही अष्टपैलू कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान कोल्हापूर येथे करण्यात आला.