मुरगूड ( शशी दरेकर ) – बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी निढोरी ता.कागल येथील भैरवनाथ मंदिर सार्वजनिक सभागृहामध्ये दसरा नवरात्रौ महोत्सव निमित्त नऊदुर्गा देवींचा चैतन्य देखावा प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र -मुरगुड यांच्या वतीने सादर करण्यात आला.
या देखाव्याचे दिपप्रज्वलनाने व जगदंबे च्या प्रतिमापूजनाने उद्घाटन करण्यात आले . सौ जयश्री देवानंद पाटील माजी सरपंच यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झाले .यावेळी सौ. रेखा मगदूम सौ. अलका गुरव सौ. मालुताई कळमकर या आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा सूर्यवंशी उपस्थित होत्या.

भैरवनाथ मंदिराचे पुजारी शिवाजी गुरव, दसरा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष आनंदा रंडे, विठ्ठल लोहार यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र मुरगुड च्या संचालिका लता बहेनजी यांनी अध्यात्मामधील नऊदुर्गांचे महत्त्व विशद केले. बी. के. भिकाजी भांदिगरे भाई, राम पाटील भाई, राजू कांबळे भाई, चित्रकार बी. के. अनिल अंगज भाई तसेच जयश्री बहेंनजी रंजना बहेंनजी व गीता पाठशाळा सर्व भाई – बहनजींचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी शेकडो महिला – पुरुष मंडळी उपस्थित होते. सुरुवातीस लक्ष्मी बहेनजी यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय चा परिचय व नवरात्री उत्सवाचे अध्यात्मिक रहस्य सांगितले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव कमिटी अध्यक्ष भैरवनाथ मंदीर निढोरी चे आनंदा रंडे यांनी आभार मानले.
Hi there friends, how is everything, and what you want to say
on the topic of this paragraph, in my view its actually amazing designed for me.