जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कोल्हापूर, सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व फेसकॉम संघटना यांच्यावतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत विपश्यना सभागृह, सामाजिक न्याय विभाग, विचारे माळ, कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले आहे.

Advertisements

कार्यक्रमात डॉ. महेंद्र कानडे यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन व विजयसिंह भोसले यांचे तणावमुक्त व सकारात्मक जीवन मनोरंजनात्मक शैली मधुन मार्गदर्शन आयोजित केले आहे.

Advertisements

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

Advertisements

  • Music matters: Fire up the music player and enjoy your favourite tunes around the clock with the powerful built-in louds…
  • Talk for longer: Talk from sunrise ‘til sundown1 and fill your day with good conversations. The 1450mAh battery delivers…
  • Ease of use: Big 2.4” display, tactile keymat, balanced design and easy-to-use UI make navigating, the features or texti…
₹2,699

ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तन्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि. 9 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे.

या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (International Day of Older Person) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!