गोकुळ शिरगाव येथे कोल्हापूर अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

गोकुळ शिरगाव  (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावर कोंडस्कर पंपा समोर एका ट्रकला आग लागली. ही घटना पहाटे साडेचार च्या दरम्यान घडली. या घटनेत गारगोटी वरून कोल्हापूरकडे लाकडी चिवाट्या घेऊन जाणारा ट्रक क्रमांक(एमएच 09 क्यू 6268) जळाला.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी की, गारगोटी वरून हा ट्रक लाकडी सामग्री घेऊन कोल्हापूर येथे जात होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोकुळ शिरगाव नजीक आल्यानंतर ट्रकचा सायलेन्सर फुटल्याने ट्रकला आग लागली. ही आग मोठा भडका घेत होती ट्रक भोवती धुराचे लोट झाल्याने पूर्ण ट्रक धुराने झाकले गेलेला होता.

Advertisements

इतक्यात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या. यानंतर कोणतेही वेळ न दवडता अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस उभे राहून त्यांनी ही आग विझवली. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे ड्राईव्हर मोहसीन पठाण, फायरमन- प्रवीण ब्रह्मदंडे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, अक्षय पाटील यांच्या सावधगिरीने व अथय प्रयत्नाने आग आटोक्यात आली.

Advertisements

त्यामुळे गाडीमध्ये असणारी लाकडी सामग्री बचावले. तसेच या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी व मोठी आर्थिकहानी झालेली नाही. याचबरोबर आग लागल्यानंतर ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. तसेच गोकुळ शिरगाव पोलिसात कोणतेही तक्रार नोंदवली नाही. तसेच सकाळी क्रेनच्या सहाय्याने ट्रक घटनास्थळावरून हलवण्यात आला.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!