गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेजने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यावर्षीही १००% यश मिळाले .शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे हे उत्तम उदाहरण आहे.

या परीक्षेत ओम श्रीकांत पाटील याने ९५.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, जुवेरिया सुरज मुल्लाणी आणि स्वयंम महेंद्र कोले या दोघांनी ९४.२०% गुण मिळवून संयुक्तपणे द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. साक्षी सर्वेश पांडे हिने ९४.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवले आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक के.डी. पाटील, प्राचार्य तेजस पाटील, उपप्राचार्या निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका शकुंतला पाटील, तसेच शिक्षकवृंद नंदा देसाई, शोभा पाटील, पल्लवी चौगुले, सुविद्या भोसले, शीतल गुरव, चैत्राली पाटील, श्रेयस पाटील आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या यशात या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे प्राचार्य तेजस पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे. संस्थेने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .पुढील वाटचालीस शुभेच्छा सर्व स्तरातून दिल्या जात आहेत.