संजय गांधी निराधार समितीच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप
कागल (विक्रांत कोरे) : तीस वर्षे तुम्ही संधी दिल्यामुळेच इतके मोठे काम करू शकलो .अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. या ऋणातून मुक्त होण्यासाठी गेली 25 30 वर्षे मी प्रयत्न करतोय. गोरगरीब सामान्य कष्टकरी माणसाचे जीवन कसे सुखी होईल त्यांच्या यातना कशा कमी करता येतील यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भैय्या माने होते .यावेळी प्रांताधिकारी चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे यांचीही उपस्थिती होती.

मी मंत्रिमंडळात काम करत असताना घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये गरीब आणि सामान्य माणसाचे हित कसे होईल हेच पाहिले . विविध योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी व या समितीने केले आहे . वयोवृद्ध, अंध, अपंग यांच्यासाठी विविध योजना आपण आणल्या . महायुती सरकारने दिव्यांगांचे पंधराशे रुपये पेन्शन आता अडीच हजार रुपये केली आहे . संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपये पेन्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
भैय्या माने म्हणाले, कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, गोरगरीब आणि अनाथांच्या कल्याणाच्या तळमळीतूनच हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना आणल्या. कागल तालुक्यात १७ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. महिन्याला सुमारे दोन कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. नेहमी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम मंत्री हसन हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले आहे.
यावेळी शशिकांत खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास साताप्पा कांबळे, राजू आमटे, तानाजी कुरणे, शिवाजीराव मगदूम यांच्यासह लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जणू पांडुरंगाचे दर्शन झाले . . . आठ दिवसापूर्वी बानगे गावात वारीत अडीचशे किलोमीटर पायी चालत आलेल्या वारीतील विणेकरी व तुळशीधारक महिलांचा पाद्यपूजन करण्याचे भाग्य मला मिळाले . यावेळी जणू काय आम्ही पांडुरंगाचे पाय धुतोय अशी भावना आमच्या मनात होती . यातून आम्हाला श्री पांडुरंगाचे दर्शनच झाले.