कागल (प्रतिनिधी) : वडिलांच्या मोटरसायकल वरून जाताना झालेल्या अपघातात मुलगी मयत झाली. हा अपघात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल- मुरगुड रस्त्यावर वड्डवाडी येथील भगवा चौकाजवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. ऐश्वर्या विनोद मिरजे वय वर्षे 19 राहणार -पिंपळगाव खुर्द, तालुका कागल असे मयत मुलगी चे नाव आहे.
कागल पोलीसातून व घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी, ऐश्वर्या ही कागल येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी वडील विनोद मिरजे याच्या ताब्यातील मोफेड अँक्सेस वाहन क्र MH-09-GT-9167 वरुन जात होती. वड्डवाडी येथुन गाडीवरुन जात असताना समोरुन मालवाहतुक टेंपो आला. टेंपोकडे पाहत विनोद मिरजे यांनी मोटरसायकलचा अचानक ब्रेक मारला.
यावेळी त्यांना गाडी आवरली नाही. त्यावेळी मागे बसलेली ऐश्वर्या ही बसलेल्या स्थितीतच रस्त्यावर खाली डोक्यावर पडली. तिच्या डोकीस जबर मार लागला. ती जागीच निपचिप पडली. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र तिचा मृत्यु झाला.
तिच्या मृत्युमुळे पिंपळगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास कागल पोलीस ठाण्यातील हवालदार पाटील हे करत आहेत.