कागल(विक्रांत कोरे) : गेल्या महिन्यापासून बेपत्ता झालेल्या अविवाहित तरुणाचा उसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत मृतदेह कागलमध्ये सापडला आहे. चिन्ह अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे भाग इतरत्र विखुरलेले होते .त्यामुळे खुनी.. की आत्महत्या… की आणखी काय ….? याचा शोध कागल पोलीस घेत आहेत.
दीपक बबन हिरे ,वय वर्षे ४०, राहणार_ पाचोरा, जिल्हा -जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.
कागल पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा येथील ट्रक चालक राजेंद्र शंकरराव पाटील हा आपला ट्रक घेऊन कागल येथील कारखान्यात साखर नेण्यासाठी आला. येताना चालक राजेंद्र पाटील याने आपल्या गल्लीत राहणाऱ्या दीपक या सोबत आणले. दीपक हा कारखाना रस्त्यावरत उतरला. तर ट्रकचालक साखर भरण्यासाठी कारखान्याकडे निघून गेला. साखर भरून परत आल्यानंतर दिपकला सोडलेल्या ठिकाणचा शोध घेतला . मात्र तो सापडला नाही. ट्रकचालक निघून गेला. दीपक परत न आल्याचे न समजताच त्याचे वडील बबन हिरे मेस्त्री हे आपल्या पुतण्यासमवेत दीपक चा शोध घेण्यासाठी कागल मध्ये आले.

तारीख ६ फेब्रुवारी रोजी कागल पोलीस ठाण्यात दीपक बेपत्ता असल्याची तक्रार ट्रक चालकाने दिली. वडील बबन हिरे मेस्त्री यांनी कागल येथे थांबून कोल्हापूर व परिसरात आपल्या मुलग्याचा शोध घेतला.
दरम्यान कारखाना लगतच्या शेतीमध्ये शेतकरी गौरव रेळेकर व वाटेकरी शंकर आंबी हे दोघे उसाची पाहणी करीत होते. जवळच्या छोट्याशा ओढ्यात कवठे दिसली त्याने कागल पोलिसांशी संपर्क साधला. याबाबतची माहिती कागल पोलिसांना देण्यात आली.
करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार ,पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार, खैरमोडे ,हवालदार अशोक पाटील, चिंतामणी बांबळे, सुरेश गुरव आदिनी पाहणी केली. शरीराचा उर्वरित भाग शंभर फुटाच्या अंतरावर चिन्ह अवस्थेत आढळून आले. मृतदेहास दुर्गंधी सुटलेली होती.शासकीय वैद्यकीय पथकाने मृतदेहाचे जागेवरच विच्छेदन केले. कवठीसह मृतदेहाचे इतर अवयव बंद पेटीतून उत्तरीय तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार विजय पाटील , सहाय्यक फौजदार वंदना मधाळे हे करीत आहेत
दीपक हा अनोळखी परिसरामध्ये आलेला होता. तो अविवाहित होता. लग्न ठरत नसले मुळे वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातच तो व्यसनाच्या आहारी गेला होता. कागल मध्ये त्याने दारू पिल्याचे समजते. मग तो अशा अवस्थेत उसाच्या शेतीमध्ये गेलाच कसा? त्यामुळे खून की अन्य काही …… यांचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.