गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : उजळाईवाडी येथे अथायु हॉस्पिटलसमोर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला आहे. गाडीचा पुढील एक्सेल रोड तुटल्याने चाक निखळले आणि गाडी बाजूच्या गटारीला धडकली. मात्र, चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार,ही गाडी क्रमांक एम. एच.०४ जे .बी.६८६८ ही तावडे हॉटेल वरून कागलच्या दिशेने जात होती . हा अपघात मंगळवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटलसमोर झाला. चालकाचे सुदैवाने प्राण वाचले असले तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये झालेली नाही.
Advertisements

AD1