पिंपळगाव बुद्रुक येथे भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार

मुरगुड पोलीस ठाण्यात भीषण अपघाताची नोंद: एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुरगुड, दि. २५ जून: कागल-निढोरी रस्त्यावर पिंपळगाव बुद्रुक येथे आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. एरटिका गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मुरगुड पोलिसांनी रामचंद्र अशोक शिंदे (वय ३५, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, आण्णासो सुखदेव शिंदे (वय ३०, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी रामचंद्र अशोक शिंदे हा आपल्या ताब्यातील एमएच-१२-एनपी-९४२४ या क्रमांकाची एरटिका गाडी भरधाव वेगाने कागल ते निढोरी रस्त्यावरून चालवत होता.

Advertisements

पिंपळगाव बुद्रुक येथील प्रवीण माने यांच्या शेताजवळ आला असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जाऊन साईडपट्टीवरील झाडाला जोरदार धडकली आणि पलटी झाली.

Advertisements

या अपघातात गाडीत बसलेले राजेश शिवाजी शिंदे (रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आरोपी रामचंद्र अशोक शिंदे यांच्यासह मोहन यशवंत शिंदे, अर्जुन भाऊसाहेब शिंदे, नवनाथ विलास शिंदे, अक्षय महादेव चन्ने आणि फिर्यादी आण्णासो सुखदेव शिंदे हे सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत.

मुरगुड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(५) आणि मोटर वाहन अधिनियम कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद पो.ना. पाटील (ब.नं. २०३१) यांनी केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक करे सो. हे पुढील तपास करत आहेत. हा गुन्हा आज (दि. २५/०६/२०२५) रोजी दुपारी ३.३८ वाजता दाखल करण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!