गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले

वाहतूक विस्कळीत, कोणतीही हानी नाही

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : आज दिवसभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यासमोर असलेले एक मोठे जीर्ण झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच, औद्योगिक वसाहत कामगारनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली. जेसीबीच्या साहाय्याने हे झाड तातडीने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आले,

Advertisements

त्यामुळे वाहतूक लवकरच पूर्ववत झाली. पावसामुळे झाड कमकुवत झाल्याने ते कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!