कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील कसबा सांगावच्या हद्दीत पंचतारांकित औद्योगिक वसाहती जवळ एका परप्रांतीय इसमाचा खून झाला आहे .खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु सदरचा खून अनैतिक संबंधातून की इतर कोणत्या कारणातून झाला असावा याचा शोध कागल पोलीस घेत आहेत .खुनाची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे .विकास सिंह राहणार मध्य प्रदेश असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे खुनाच्या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे
कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कागल औद्योगिक वसाहती जवळ, कसबा सांगाव हद्दीत, चिकोडे कोडी शेजारी, सामाजिक वनीकरणात झुडपात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असावी असे समजते. शनिवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यास ही घटना समजली. खून झालेल्या इसमाच्या काही अंतरावर एक आधार कार्ड सापडले आहे. त्यावर विकाश सिंह, 142 सिल्वर ग्राम, सिल्वर पोस्ट, तालुका माझीली, वार्ड 12 गीजवारा, मध्य प्रदेश असा पत्ता आहे. ते नाव पत्ता मयत इसमाचा आहे का की खून करणाऱ्याचा आहे, त्याचा तपास पोलीस औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत जाऊन घेतला वनीकरणात ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता त्याच्या 100 मीटर परिसरात दोन चपला तसेच दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
पोलीस श्वान देखील 100 मीटर परिसरातच घुटमळले ठोस काही हाती लागले नाही. एलसीबी पथक, ठसे तज्ञ यांनीही आपला तपास सुरू ठेवला होता . सदरचा खून अनैतिक संबंधातून की इतर कोणत्या कारणातू झाला असावा याचा शोध पोलीस घेत आहेत.
या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, एलसीबी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक नागेश खैरमोडे, वैभव जमादार तसेच पोलीस कर्मचारी तपास यंत्रणेत सहभागी झाले होते.
I have been browsing online more than three hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my view if all website owners and bloggers made good content as you did the internet will be a lot more useful than ever before