
कागल : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कागल येथील ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याच्या काम सुरू आहे. यावेळी गाळ काढल्यानंतर तलाव लवकर भरण्यासाठी आवश्यक असलेल्या चरीच्या काँक्रीट अस्तरीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी देण्यात आला आहे.

दूधगंगेच्या डाव्या कालव्यातून जयसिंगराव तलावात पाणी सोडण्यासाठी 450 मिलिमीटर व्यासाचे पाईपचे गेट कालव्यावर आहे. परंतु या गेटपासून तलावात पाणी येण्याचा मार्ग गाळ व मातीने भरलेला आहे.

गेटपासून तलावापर्यंत पाणी येण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या व कालवा विभागाच्या सहकार्याने चर नव्याने खुदाई करण्याचे काम सुरू आहे.
एक किलोमीटर अंतराच्या या चरीसाठी काँक्रीट अस्तरीकरणाच्या कामामुळे गेटपासून पाणी तलावात जलद गतीने व पूर्ण क्षमतेने येऊ शकते. यामुळे पाणी पाझरणार नाही व तलाव लवकर भरण्यास मदत होईल. या प्रस्तावासाठी शासकीय देण्यात आला आहे अशी माहिती अधिकारी यांनी दिली