मुरगूड (शशी दरेकर) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये २ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त इतिहास विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.होडगे होते .
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्चना कांबळे यांनी केले . त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महात्मा गांधीजींचे कार्य त्यांचे विचार आणि त्यांचे व्यक्तिमत्व याविषयी सविस्तर माहिती दिली.यानंतर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भित्तीपत्रकांचे उद्घाटन प्राचार्य डॉ एस एम होडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या भितीपत्रकांची माहिती सांगून सुंदर असे विश्लेषण केले.याबरोबरच बी.ए.भाग दोन ची विद्यार्थिनी कु.पूजा राऊत हिने महात्मा गांधीजी यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ.एस.एम.होडगे यांनी महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास त्यांचे अहिंसात्मक विचार लेखन कार्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान याविषयी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे सत्य अहिंसा स्वच्छतेचे महत्व हे विचार आजही आपल्याला प्रेरणादायी आहेत.सत्य आणि शांततेतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.एम.एस.पाटील स्टाफ सेक्रेटरी प्रा.सरदेसाई डॉ.एच.एम.सोहनी प्रा.डी.पी.साळुंखे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.नितेश रायकर यांनी मानले.

एकूणच इतिहास विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे कार्य व महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता आले.