डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी मार्गदर्शन
कोल्हापूर: जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महत्त्वाचा पेन्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात Digital Life Certificate (ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र) सादर करण्यासंबंधी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या इतर अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
Advertisements
- स्थळ: महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.
- वेळ: सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत.
- उद्देश: निवृत्तीवेतनधारकांना ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात मदत करणे व त्यांच्या समस्यांचे निवारण करणे.
जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी सकाळी ११ वाजता मेळाव्यास निश्चितपणे उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
Advertisements

AD1