कोल्हापुरात ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात, तीन टप्प्यांत अभियान राबवणार

कोल्हापूर : जनतेच्या सेवेसाठी महसूल विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू केले असून, या अंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ सुरू झाला आहे. हा पंधरवडा २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा जलदगतीने मिळवून देण्यावर भर दिला जात आहे.

Advertisements

या अभियानाचे तीन प्रमुख टप्पे आहेत:

पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर): यामध्ये ‘पाणंद रस्ते मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतरस्त्यांचे सर्वेक्षण, मोजणी, आणि अतिक्रमणे काढून टाकण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

Advertisements

दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर): या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ योजनेची अंमलबजावणी वेगवान केली जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर घरकुल योजनांमधील प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष दिले जाईल.

Advertisements
  • Unsinkable Cruise Ship – This Liquid Motion Ornament the Outer Material is Acrylic, The Titanic are Resin, The Sea Water…
  • Natural Stress Relief – The Slow Movement, Vibrant Colors, and Smooth Droplets Can Help Children and Adults Refocus, Let…
  • Leak-proof, Durable Design – Special Supplies It Sealed Liquid Motion From Top to Bottom, Which Means Kids Can Shake The…

तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर): या टप्प्यात ‘नाविन्यपूर्ण उपक्रम’ राबवले जातील. यात ‘१०० दिवसात प्लास्टिक दूर’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ई-ऑफिसचा वापर वाढवणे यावर भर असेल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!