कागल तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चा ग्रामसभांमधून शुभारंभ

कागल (प्रतिनिधी) : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण पातळीवर गावचा शाश्वत विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.

Advertisements

या अभियानाच्या अनुषंगाने, कागल तालुक्यात आज एकाच वेळी ८३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभांमध्ये गावाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग आणि बांधिलकी महत्त्वाची आहे, यावर भर देण्यात आला. पिंपळगाव बु. येथील ग्रामसभेला गटविकास अधिकारी श्री. कुलदीप बोंगे यांनी स्वतः उपस्थित राहून या अभियानाविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

Advertisements

ग्रामसभांमध्ये अभियानाचे उद्दिष्ट, राबविण्यात येणारे विविध उपक्रम, आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने करावयाच्या कृतींवर सविस्तर चर्चा झाली. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी या अभियानामुळे गावाचा विकास होईल आणि मिळणाऱ्या बक्षीस रकमेचा उपयोग आवश्यक कामांसाठी करता येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सर्व ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला.

Advertisements

या अभियानामध्ये प्रामुख्याने सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि लोकसहभाग या घटकांवर भर दिला जाणार आहे.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कागल यांनी या अभियानाविषयी बोलताना सांगितले की, हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवले जाणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातील.

  • 【Elimination Of Odor】: Car air freshener has concentration and extraction of natural flower and fruit tree raw materials…
  • 【Solar-Powered Drive】- Using car fresheners solar energy to drive intelligent rotating purifier, solar car accessories a…
  • 【Exquisite Appearance and Widely used】- Car accessories interior decoration, made of light luxury alloy, the shape is mi…

त्यांनी विश्वास व्यक्त केला की, कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती चांगल्या प्रकारे काम करतील आणि तालुका राज्यात आदर्श म्हणून नावारूपास येईल. जास्तीत जास्त ग्रामपंचायती आणि पंचायत समितीही बक्षीस योजनेस पात्र ठरतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!