ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोल्हापूर: जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्यास गती देण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजीच्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी ही केंद्रे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

Advertisements

छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विरंगुळा केंद्र केवळ मनोरंजनाचा साधन नसून सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठीही ही महत्त्वाची ठिकाणे ठरतात. यामुळे जेष्ठांमध्ये निर्माण होणारे एकटेपणा, नैराश्य व ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

Advertisements

सध्या जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये २० विरंगुळा केंद्रे कार्यरत असून, त्यामध्ये आणखी सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. नगरपालिकांनी निधीचा योग्य वापर करून जेष्ठांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात आयोजित आरोग्य शिबिरांना जेष्ठांनी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisements

या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे, जिल्हा नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतेकर, तसेच अशासकीय सदस्य व जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जेष्ठांच्या विविध मागण्या आणि योजनांवर चर्चा झाली.

  • 4-in-1 USB Hub, 1 3.0 USB-A port, and 3 2.0 USB-A ports make it easier to connect different devices at the same time.
  • With 4 USB-A ports, Mport 31 makes multitasking easy and gives you added comfort while working.
  • USB 3.0 port gives you high-speed connectivity with up to 5Gbps data transfer speed.

दरम्यान, ‘वयोश्री योजना’ अंतर्गत प्रलंबित अर्जांची त्वरित निकाली काढणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. बँकांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग, बसण्याची सोय आणि पिण्याचे पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठीही लवकरच बँकांना सूचना दिल्या जाणार आहेत.

शासकीय कार्यालयांत जेष्ठ नागरिकांना प्राधान्याने सेवा पुरविण्याची सुरुवात झाली असून, प्रांत कार्यालयांत लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जेष्ठांना शासकीय योजनांबाबत माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे उपक्रम राबवले जातील. येणाऱ्या सेवा पंधरवड्यात जेष्ठांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठीही विशेष मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!