कोल्हापूर : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 चा निकाल दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण 6 हजार 320 प्रविष्ठ (Appear) विद्यार्थी, उमेदवारांपैकी 2 हजार 789 विद्यार्थी, उमेदवारांचा निकाल दि. 25 ऑगस्ट 2025 प्रसिध्द करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
- 4-in-1 USB Hub, 1 3.0 USB-A port, and 3 2.0 USB-A ports make it easier to connect different devices at the same time.
- With 4 USB-A ports, Mport 31 makes multitasking easy and gives you added comfort while working.
- USB 3.0 port gives you high-speed connectivity with up to 5Gbps data transfer speed.
IBPS संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक 27 ते 30 मे 2025 व दिनांक 2 ते 5 जून 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण 2 लाख 11 हजार 308 प्रविष्ठ झाले होते.

विद्यार्थी, उमेदवारांच्या मागणीनुसार पुनःश्च विहित नमुन्यातील गुणयादी (SCORE LIST) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.