कुरुकलीत भरदिवसा  बंद घर फोडून २ लाख ७६ हजाराची धाडसी चोरी

सोन्या, चांदीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरुकली तालुका कागल येथे गावाच्या मध्यवस्तीमध्ये  अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मागील बाजूने घरात शिरून तिजोरीतील अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार, अडीच तोळ्याचे गंठण, साडेतीन ग्रॅम  वजनाचे कानातील दोन जोड सोन्याचे टॉप्स, एक ग्रम वजनाचे टॉप्स दोन नग, ऐशीग्रम वजनाचा चांदीचा छल्ला, चांदीचे तीन पैजन जोड असा एकूण २ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानीं चोरुन नेला.

  श्वानपथक तसेच ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. भर दिवसा झालेल्या या धाडसी चोरीने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे .मुरगूड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की पांडुरंग धोंडीराम पाटील यांच्या घरातील माणसे दुपारी बाराच्या दरम्यान घराला कुलूप लावून शेताकडे गेली होती. शेतातील काम आटोपून दुपारी ३ वाजता घरी आल्यावर तिजोरी उघडीच दिसली. त्यातील  साहित्य इतस्थतः विस्कटलेले दिसले. सोन्या -चांदीचे दागिने चोरटयानी चोरून नेल्याचे लक्षात आले.

Advertisements

घटनास्थळाची पोलिसांनी माहिती घेवून पंचनामा केला. चोरट्यांनी तिजोरीवर भला मोठा दगड मारून तिजोरीची काच फोडली आहे.  चोरटे मागील दारातून आत आले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी  श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान घरातच बराच वेळ घुटमळत घराच्या मागील बाजू पर्यंत गेले. 

Advertisements

पोलिसांनी ठसे तज्ञांना पाचारण करून ठसे घेतले आहेत. एल.सी.बी च्या पथकाकडूनही घटनास्थळी येवून माहिती घेतली आहे. मुरगूड पोलीस ठाण्याच्या  पी.एस.आय. प्रियंका वाकळे या आपल्या पथकासह चोरीचा कसून तपास करत आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!