समाजकार्यांत व विद्यार्थ्यांत सेवानिवृत्ती नंतरही इंग्रजी विषय ज्ञानदानाच्या प्रभुत्वासाठी कार्यरत रहा – आमदार जयंत आसगावकर

मडिलगे (जोतीराम पोवार) –  शाळा तसेच विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी विषया विषयी गोडी निर्माण केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतरही यापुढे समाजकार्यात व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानासाठी कार्यतत्पर रहा असे प्रतिपादन पुणे मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी केले. ते वाघापूर ता. भुदरगड येथील वाघापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी.पाटील. यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्य मानपत्र वितरण व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, अध्यक्षस्थानी केदारर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण कुरडे हे होते.

Advertisements

यावेळी बोलताना आसगावकर यांनी शासनाने चुकीच्या पद्धतीने नव्याने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रवेश प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त करताना भविष्यात शिक्षणाचा मार्ग खडतर होणार असल्याचे सांगितले. यावेळी को. जी. मा. शिचे तज्ञ संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी शैक्षणिक क्षेत्रातील शासनाचे कमी पट संख्या विषयाचे धोरण तसेच येणारी आव्हाने या विषयी विवेचन केले,

Advertisements

पंचायत समिती राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाने यांनी आपल्या मनोगतात साने गुरुजींच्या संकल्पनेतील आजच्या शिक्षण क्षेत्रातील आदर्शवंत शिक्षक कोण असेल तर ते म्हणजे डी. पी. पाटील. होय असे गौरोउद्गगार काढले. यावेळी माजी ग्रामसेवक जी. डी. आरडे म्हणाले विद्यार्थ्यांच्यात इंग्रजी विषयाविषयी गोडी निर्माण केलीच शिवाय त्यांच्यात देवत्व प्राप्त केले.

Advertisements

यावेळी पंचायत समिती भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे, मुख्याध्यापक संघ कोल्हापूरचे उपाध्यक्ष मिलिंद पांगरेकर, केंद्रप्रमुख बी. एस. पाटील, पी.एस.पाटील, वाय. पी. पाटील, अनिकेत हुल्ले, सागर परीट, किरण कुरडे आदींनी मनोगत व्यक्त केले.               


सत्कार समारंभास उत्तर देताना डी. पी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ कालावधीत केदारर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळातील संस्थापक संचालक यांच्या सहकार्यामुळे तसेच शाळा व विद्यार्थ्यांच्यावर  लागलेला लळा व कुटुंबीयांची साथ यामुळेच सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत प्रोत्साहित झालो असल्याचे म्हंटले.

Advertisements

यावेळी बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे, सरपंच बापूसो आरडे, उपसरपंच दिपाली दाभोळे, केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विद्यमान व माजी संचालक, केंद्र गंगापूर व मडिलगे अंतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी वाघापूर गावातील सर्व विविध सेवा संस्थांचे अध्यक्ष, भुदरगड तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक वाय. बी. शिंदे यांनी तर आभार यु. एम. शेंडगे यांनी मानले.                                

गुरु शिष्यांचा सत्कार

कार्यक्रम स्थळी गौरव समितीच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्य इंग्रजी विषयाचे मुख्याध्यापक डी.पी.पाटील यांचा सत्कार तर ज्या डी.पी.पाटील यांनी इंग्रजी विषयातून नावलौकिक मिळवला व त्यांना घडवणारे त्यांचे इंग्रजी विषयाचे गुरु कुलकर्णी सर यांचाही गौरव समितीच्या वतीने सत्कार आयोजित केल्याने उपस्थिंतात आनंद द्विगुणीत झाला.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!