मुरगूड येथे ५ मार्चपासून स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धां

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील  स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने ५ ते ९  मार्च दरम्यान मुरगूड येथे कागल तालुका प्रिमिअर लिग २०२५ स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे(डे नाईट) आयोजन केल्याची माहिती स्वराज्य स्पोर्ट्स च्या संयोजकांनी दिली.

Advertisements

या स्पर्धेत १६ संघांना निमंत्रित केले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक ५५९९९,द्वितीय क्रमांक ३३९९९ व तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी  ९९९९ अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच स्वर्गीय श्रीपती चौगले यांच्या स्मरणार्थ डॉ . सुनील चौगले यांच्याकडून सर्व चषक देण्यात येणार आहेत.

Advertisements

            या प्रकाश झोतातील सामन्यांचे उद्घाटन ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता  कागल तहसिलदार अमरदिप वाकडे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी मुख्याधिकारी आतिश वाळुंज ,सपोनि शिवाजी करे , संताजी शुगरचे कार्यकारी संचालक संजय घाटगे , बिद्री साखरचे कृष्णात चौगले , भोगावती साखरचे फॅक्टरी मॅनेजर गणपतराव लोकरे , निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील , पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा . रविंद्र शिंदे , प्राचार्य एस पी पाटील , जी के भोसले , माजी नगरसेवक किरण गवाणकर , लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे सभापती किशोर पोतदार , अभियंता मयुर आंगज , विजय हुल्ले , निवास कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.

Advertisements

           अशी माहिती रमेश वाइंगडे, सुशांत मांगोरे, विकी बोरगावे, नंदूकिशोर खराडे,सागर सापळे, नंदू चौगले अमर कांबळे, पांडुरंग चव्हाण अनिकेत बेनके,अमित तोरशे, सुनिल कांबळे, पंकज नेसरिकर ,अनिकेत नलवडे, सत्यजित चौगुले, पृथ्वीराज चव्हाण, समाधान बोते.यांनी दिली आहे.

2 thoughts on “मुरगूड येथे ५ मार्चपासून स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धां”

  1. obviously like your website but you need to test the spelling on quite a few of your posts Several of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to inform the reality on the other hand Ill certainly come back again

    Reply
  2. It’s a pity you don’t have a donate button! I’d definitely donate to this brilliant blog! I guess for now i’ll settle for book-marking and adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will share this site with my Facebook group. Chat soon!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!