कागल /प्रतिनिधी : दि. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय कागल येथे अग्रणी महाविद्यालयांतर्गत एकदिवशीय कार्यशाळा शनिवार दिनांक ८/२/२०२५ रोजी घेण्यात आली यामध्ये जिल्यातील विविध बी.एड काँलेजचे प्राध्यापक व छात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष. सुनिल (दादा) माने व विभागप्रमुख एस. एस. संकपाळ सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Advertisements

या कार्यक्रमात विविध बिषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती यामध्ये आधारीत अध्ययन’ या विषयावर खराडे बी.एड काँलेज कोल्हापुरच्या जेष्ठ प्राध्यापिका मुक्ता पाटील मँडम यांचे व्याख्यान झाले विद्यार्थीचे अध्ययन’ झाले हे कसे ओळखावे व अध्ययन’ होण्याकरिता कोणकोणत्या प्रक्रीया घडतात.

Advertisements

यामध्ये शिक्षकांची भूमिका कोणती असते याविषयी पी. पी. टी च्या साहाय्यानें माहीती दिली तसेच सेंट झेवियर इंग्रजी माध्यमाच्या डी.एड काँलेजच्या प्राचार्या, अनुराधा मधाळे मँडम यांनीही अध्ययन’ अध्यापन प्रक्रीया कशी घडते हे काही बौध्दीक चाचण्यांचा उपयोग करुन प्रात्यक्षिकासह माहीती दिली.

Advertisements

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँलेजच्या प्राचार्या श्रीमती लकाडे एस एस मँडम या होत्या.तर कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक प्रा.आर. के. पाटील मँडम यांनी केले. या कार्यक्रमाला बी. टी.काँलेजचे प्रा. गौतम माने सर, बी.एड. काँलेज पेठवडगाव च्या प्राध्यापिका पवार मँडम, वसंतराव नाईक बी.एड काँलेजच्या प्राध्यापिका कांबळे मँडम, महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय मार्केड यार्ड कोल्हापुरच्या जेष्ठ प्राध्यापिका मनिषा पाटील व छात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रा आर के पाटील व प्रा. सी. आर पवार सर यांनी केले सूत्रसंचलन कु कोमल पाटील हीने केले, तर आभार कोमल माळकर हीने मानले या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी प्रताप भैय्या माने व संस्थेचे संचालक बिपिन माने सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *