कागल : विनापरवाना बेकायदेशीर बंदूक जवळ बाळगले बद्दल बाचणी येथील धोंडीराम जाधव यांच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम निवृत्ती जाधव (वय 36, रा. देवाचा माळ, केंबळी रोड, बाचणी, ता. कागल) यांच्याजवळ ठेचणीची सिंगलबारी विनापरवाना बेकायदेशीर ४६ इंचीची ठेचणीची बंदूक आढळून आली.
याबद्दल त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माने करत आहेत.