मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेतर्फे पाच नवीन  वाहनांचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सर्व परिचीत असणारी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे नवीन पाच वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्यावतीने श्री .ओंकार परीट यानां फोरव्हिलर ईरटीका गाडी , संदीप ढेंगे व दिलीप कुंभार यानां ऑटोरिक्षा , राजाराम चौगले यानां बुलेट व रणजीत शेंडे यानां टीव्हीएस़ या वाहनांचे वितरण करण्यात आले . यावेळी वाहनांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले .व वाहनधारक मालकांना वाहनांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या.

Advertisements

यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा गारगोटी येथिल मॅनेंजर मा . श्री . मस्के साहेब यानीं संस्थेला सदिच्छा भेट देऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी मस्के साहेबांचा सभापती गवाणकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

Advertisements

या वाहन वितरण प्रसंगी सभापती श्री . किरण गवाणकर, उपसभापती श्री. प्रकाश सणगर , संचालक सर्वश्री प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, निवास कदम, संदीप कांबळे, हाजी धोंडीबा मकानदार, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, संस्थेचे मॅनेंजर सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते.

Advertisements
AD1

2 thoughts on “मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेतर्फे पाच नवीन  वाहनांचे वितरण”

  1. I was wondering if you ever thought of changing the page layout of your website? Its very well written; I love what youve got to say. But maybe you could a little more in the way of content so people could connect with it better. Youve got an awful lot of text for only having 1 or 2 pictures. Maybe you could space it out better?

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!