कागल (प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदेच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २५ ते रविवार २९ डिसेंबर असे पाच दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. सलग पाच दिवस व्याख्यानमालेच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना मेजवानी ठरणार आहे.अशी माहिती कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
व्याख्यानमालेत सलग पाच दिवस पाच पुष्प गुंफली जाणार आहेत ती अशी,बुधवार, दि. २५ रोजी – प्रसिद्ध कवी व व्याख्याते इंद्रजित भालेराव (परभणी) ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता’. गुरुवार, दि. २६ रोजी संजय कळमकर (अहिल्यानगर) ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’. शुक्रवार, दि. २७ रोजी,प्रसिद्ध शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे (कवठेमहांकाळ). ‘जाणीव शिवशंभूच्या बलिदानाची’. शनिवार, दि. २८ रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते ऋषीकेश जोशी (मुंबई) ‘कलाकारांचे अंतरंग’. रविवार, दि. २९,रोजी आयएएस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे-नवत्रे (सोलापूर) ‘स्पर्धा परीक्षा व तयारी’ या विषयावर व्याख्या त्यांची व्याख्याने होणार आहेत.
व्याख्यानमालेचा शुभारंभ व समारोप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी कागल आणि परिसरातील तसेच तालुक्यातील साहित्यप्रेमी, रसिक श्रोते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केले.
पत्रकार बैठकीस, शाहू व्याख्यानमाला प्रमुख सुरेश रेळेकर, वि. म. बोते, विश्वजित संकपाळ, विष्णू खाडे, प्रा. मोहन तोरगलकर, सम्राट सणगर, यशवंत कर्णेकरी, तानाजी पाटील,वंदूरकर, भास्कर चंदनशिवे, कृष्णात कोरे यांच्यासह व्याख्यानमाला समीतीचे सदस्य उपस्थित होते.