विवाहित महिलेने केली आत्महत्या

कागल (प्रतिनिधी) : सासू-सासरा व पती यांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार मौजे सांगाव तालुका कागल येथे सोमवारी दुपारी घडला. कागल पोलीस ठाण्यात सासु, सासरा व पती यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisements

        सौ शुभांगी सयाजी माळी वय वर्ष 26, राहणार मौजे सांगाव, तालुका कागल, असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

Advertisements

        पती सयाजी प्रकाश माळी सासू सौ छाया प्रकाश माळी सासरा प्रकाश कृष्णात माळी तिघेही राहणार मौजै सांगाव या तिघांवर कागल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी व मयत शुभांगी यांच्यात वारंवार भांडणे होत असत. या भांडणाच्या त्रासाला कंटाळून शुभांगी माळी हिने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खैरमोडे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!